सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी (डॉ. अनिरुध्द जोशी) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ च्या हिंदी प्रवचनात “व्हेज चीज” व “नॉनव्हेज चीज”बद्दल माहिती सांगितली. चीज, जे आज अनेकांच्या सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत स्थान घेऊन बसले आहे त्याच्या प्रकारांबद्दल व बनवायच्या प्रक्रियेबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे; व ही खरोखरच गंभीर बाब आहे. पण आज चीज हळू-हळू सॅन्डविच, सूप, पराठे, कोफता, पावभाजी, डोसा, पकोडे, टोस्ट, सॅलड, रोल्स्, पिझ्झा, बर्गर, इतकच काय तर आपल्या रोजच्या भाज्यांच्या रस्स्यामध्ये व अगदी आपल्या नेहमीच्या वडापावमध्ये सुध्दा जागा घेऊ लागलं आहे. त्यामुळे ह्या चीजबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं झालं आहे. म्हणून थोडक्यात पाहूया की चीज बनतं कसं.(http://en.wikipedia.org/wiki/
Rennet).
- See more at: http://aniruddhafriend-samirsinh.com/vegetarian-nonveg-cheese-2/#sthash.xcJvksTs.PzI01dS0.dpuf
व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज



